केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाल्याने राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. राम मंदिर भूमिपूजनंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
“आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. प्रभु श्री राम यांच्या जन्मभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिराचं भूमिपूजन आणि पायाभरणी झाली. यामुळे महान भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या इतिहासाचा एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. ही एका नव्या युगाची सुरुवात आहे.” असे अमित शाह म्हणाले.
“अयोध्येत राम मंदिर उभारणे ही जगभरातील हिंदूंची शतकानुशतकांची श्रद्धा आहे. आज पंतप्रधान मोदी आणि श्री राम जन्मभूमि ट्रस्टने भूमिपूजन करुन कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचा सन्मान केला आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो,” असंही अमित शाह म्हणाले.