कोरोनावर मात करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घरी गेल्यानंतर रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. यामुळे पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधरली असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे एम्स रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
17 ऑगस्टला रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यामुळे त्यांना रात्रीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते. आज एम्सने बुलेटीन काढत अमित शहा ठणठणीत बरे झाले असून त्यांच्यावर कोरोनापश्चात उपचार सुरु होते. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.