पुणे : 14 ऑक्टोबर 2020 पासून चालू असलेल्या पावसामुळे इंदापूर तालुक्यात व परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे, रस्ते वाहून गेले आहेत, शेतीचे नुकसान झालेला आहे, कापणी करून ठेवलेली पीक या पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला आहेत. अनेक जण या पावसामुळे अडकून पडलेला आहेत. दि.14 ऑक्टोबर पासूनच जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या यंत्रणेमार्फत मदत कार्य मोठ्या प्रमाणावर पोहचवण्याचे काम चालू आहे.
दि.15 ऑक्टोबर रोजी त्यांनी जिल्हा परिषद गटातील नरसिंहपूर, नोंदी, ओझरे, पिंपरी, बावडा, गिरवी, गणेशवाडी व इतर ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व लोकांना आधार दिला. तसेच यावेळी त्यांनी सरकारकडे विनंती आहे की या सर्व गोष्टींची तात्काळ दखल घेत सरकारने त्वरित त्याचे पंचनामे करावेत व सर्वांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.
Read Also
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी… उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा खुलासाhttps://t.co/rhs4D20LaF#Jalyuktshivar #AjitPawar #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020