मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशाचे वातावरण तापले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
” सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीने करत होती. मात्र अचानक याचा तापास सीबीआयकडे सोपवण्यात आला त्यामुळे सीबीआयच्या निकालाची आम्ही हि अत्यंत वाट पाहत आहोत. लोक विचारत आहेत सुशांतने आत्महत्या केली कि हत्या याबातच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. “असे देशमुख म्हणाले आहेत
दरम्यान सुशांतच्या कुटूंबाने पूर्वी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची नावे ड्रग्सशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. तर श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.
Read Also :
विश्वास नांगरे पाटील शरद पवारांचा भेटीला , कारण अस्पष्ट https://t.co/9KLfrlixBZ#SharadPawar #Vishwasnangarepatil
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020