अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. याप्रकरणात एक नाव सुशांतचा मित्र संदीप सिंहचे चर्चेत आहे. संदीप सिंह आणि भाजपचे संबंध असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी संदीप सिंहचे भाजप संबंध तपासण्यासाठी सीबीआयला निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे.
I have received many requests & complaints to investigate the relationship between Sandeep Singh, who made PM Modi's biopic & BJP; regarding his connection with Bollywood & drugs. I will send these requests to CBI for investigation: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/DcQvLZypqV
— ANI (@ANI) August 29, 2020
अनिल देशमुख म्हणाले की, पंतप्रधान मोदींवरील बायोपिक बनवणाऱ्या संदीप सिंह आणि भाजपचे संबंधांची चौकशी करावी याबाबत मला अनेक विनंती आणि तक्रारी आल्या आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांशी काय संबंध आहेत? यासंदर्भातील तपास करण्याचे निवेदन सीबीआयला पाठवणार आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे, याची आपल्याला कल्पना आहे. त्यांचे पाच वर्ष सरकार होते. त्यावेळी त्यांनी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे”, असा टोला अनिल देशमुख यांनी यावेळी लगावला.