मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार? असा सवाल शिवसेना मंत्री अनिल परब यांनी विचारत भाजपावर निशाणा साधला आहे .
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावरून उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिवसेना आमदारांसोबत चर्चा केली आहे. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शिवसेनेच्या आमदारांशी नव्हे तर टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, आश्वासनं कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच सामना शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी कोणत्याही पक्षाची बातमी त्यात लागू शकते, कोणाची मुलाखत घ्यायची हा संपादकांचा अधिकार आहे. फडणवीस भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे.
Read Also :
फोटो भगत सिंह यांचा श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना ! शिवसेनेच्या खासदारावर नेटकरी संतापलेhttps://t.co/dHPO3HJfH0#ShivsenaMP #PriyankaChaturvedi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020