मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार पडत असून, परिणामी रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर आणि इतर औषधांसाठी वणवण फिरावे लागत आहे.
दरम्यान, राज्यात ऑक्सिजन अभावी अनेक करोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या प्रशासनाने, वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वेमार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल का, असे केंद्र शासनाला सुचवले होते.
त्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशभरात ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या राज्यांना होणार असून, त्यामध्ये महाराष्ट्र देखील एक आहे.
महाराष्ट्रासाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी ७ टँकरची देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ रवाना. परिवहन मंत्री @advanilparab यांनी दाखविला हिरवा दिवा. रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग. पाच दिवसात येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू. pic.twitter.com/JQpqYUjrp5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2021
नुकत्याच या पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस महाराष्ट्राला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे लवकरच आता ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या मदतीने महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तसेच यापुढील काळात देखील ऑक्सिजनच्या सततच्या पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
Railways is running its first Oxygen Express in its fight against COVID-19. The Ro-Ro service with 7 empty tankers departed from Kalamboli, Maharashtra for Vizag today.
Oxygen Express will move via a green corridor for loading with Liquid Medical Oxygen. pic.twitter.com/TonlClDdQf— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 19, 2021
ही ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ ७ मोठे टँकर घेऊन जाणार असून, या एक्सप्रेसच्या माध्यमातून, येत्या ५ दिवसांत ११० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा राज्याला होणार आहे. दरम्यान, कळंबोली रेल्वे स्टेशनहून हे सात रिकामे टँकर्स विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला, बोकारो येथे रवाना होणार असून, तिथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल होणार आहे.