मुंबई : महाराष्ट्रावर भगवा फडकवायचंय, हे विधान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डोईजड होण्याची शक्यता आहे, कारण आधी या विधानावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेचे कान उपटले होते आता यावर भाजपकडून शिवसेनेची जोरदार कोंडी केली जात आहे, कारण आता भाजप नेते निलेश राणेंनी शिवसेनेवर पवारांच्या विधानाचा आधार घेत जोरदार टीका केलीये.
‘मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली’ असं ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली. https://t.co/vtHnwzT6ny
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 29, 2020
दरम्यान शरद पवारांच्या शिवसेनेवरील टिकेवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केलीय. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं होत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत गेले ३०-३५ वर्ष आपण हे एकत असल्याचं म्हटलं होतं. “सोनारानंच कान टोचले हे बरं झालं,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
Read Also :
भेट झाली राज ठाकरे आणि राज्यपालांमध्ये चंद्रकांत पाटील यांचा टोला मात्र मुख्यमंत्र्यांनाhttps://t.co/C6u2ojVj5v#Rajthackarey #BJP #Shivsena #MNS #Chadrkantpatil
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020