पुणे : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. पुणे महापालिका निवडणुकरिता राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळजाई टेकडीवरील उद्यानाच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं.
एसटी विलिनीकरणाच्या निर्णयाला मुहूर्त मिळेना; कोर्टाकडून सुनावणीला ‘तारीख पे तारीख’ सुरूचं
पुणेकरांना टोला लगावत अजित पवार म्हणाले की, टेकडीवर तुम्ही फिरायला या, पण तुमचे कुत्रे लाडाने घेऊन येऊ नका. त्यांचे काय लाड करायचे आहेत ते घरी करा. घरी गादीवर झोपवले तरी आम्हाला काही घेणदेण नाही. तुमच्या मुलांपेक्षा जास्त सांभाळा पण टेकडीवर घेऊन येऊ नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला.
आदित्य ठाकरेंचा उत्तर प्रदेशमध्ये भाजपवर हल्लाबोल! म्हणाले…
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणाच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. गेल्या सव्वादोन वर्षापासून भाजपकडून सरकार लवकरच लवकर पडेल, अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोवर सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहेत तोपर्यंत सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
Read also:
- राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
- गली गली मैं शौर है भाजप वाले महाचोर है; रूपाली पाटलांचा भाजपवर 2500 कोटींचा आरोप
- कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात लढणार; कोअर कमिटी बैठकीत निर्णय
- मी पुन्हा येईन म्हणून न येणं फारचं वाईट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना पुन्हा टोमणे
- आरएसएस, रिपाई संघटना आपल्या सोबत, एक राहा, विलिनीकरण होणारच; सदावर्तेंची आझाद मैदानातून गर्जना