पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी तेजस यांनी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता. या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेजस ठाकरे यांचा सात ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे प्रस्तावाला मिळालेली मान्यता हे त्यांच्यासाठी अनोखं गिफ्टच ठरलं
त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी तेजस ठाकरे यांना अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. “तेजस ठाकरे यांनी खेकडे, पालीनंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली. त्याला वन्य जीव मंडळाने मंजुरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!” अशा शब्दात शेलारांनी कौतुक केले आहे
तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच!
महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020