मुंबई : तेजस ठाकरे यांनी आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असलेल्या माशाची चौथी प्रजाती शोधून काढली आहे. या माशाचे नावही हिरण्यकेशी ठेवण्यात आलं आहे. तेजस ठाकरे यांच्या या नव्या शोधाचे चक्क भाजप नेते आशिष शेलार यांनीही कौतुक केलं आहे. सामना वृत्तपत्रातील बातमी शेअर करत शेलार यांनी ठाकरेंसाठी ट्विट केलं आहे.
तेजस ठाकरे यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारं आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे कौतुक केलं आहे.
‘जीवसृष्टीला निसर्गानं अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी हिरण्यकेशी प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे,’ असं ट्विट शेलारांनी केलं आहे.
खेकड्यांच्या संशोधनानंतर तेजस ठाकरेंनी पालींच्या विविध प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.
जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले..त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी "हिरण्यकेशी"प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट! https://t.co/CJu281Enwl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 17, 2020
वाइल्ड लाइफ हा तेजस यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत.
Read Also
सुशांत सिंह प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंबाबत पोस्ट करणाऱ्या 'त्या' व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटकhttps://t.co/n4AUWPVQUe#Adityathackarey #shivsena #Bjp #SSRCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 17, 2020