औरगाबाद : एकीकडे राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला असताना दुसरीकडे औरंगाबाद शहरात मराठा तरुण आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपुर्वी इशारा दिलेल्या तरूणाने चक्क आज औरंगाबादेत स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वेळीच खबरदारी घेत पोलिसांनी सावरासावर केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न अजून ज्वलंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबादेत मराठा तरूण अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपुर्वी एका मराठा १ तारखेपर्यंत आरक्षण नाही दिल्यास १ तारखेला स्वत: ला रॉकेल टाकून जाळून घेईल असा इशारा दिला होता. आरक्षणावर कोणत्याहगी प्रकारचा निर्णय झाला नसल्याने या तरूणाने स्वत;ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आक्रमक झालेल्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ते सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता ६ जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी २ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.