पुणे : काल काही तासांसाठी मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड ताण सहन करावा लागला. ज्यामध्ये लोकल पासून ते मंत्रालयापर्यंत सर्व काही ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.नेटकऱ्यांना मात्र यामुळे हातात जणू आयते कोलीतच मिळाले. मुंबईतील पावर कट झाली आणि सोहस्ल मीडियावर अक्षरशः मिमचा पाऊस पडला.
नेटकऱ्यांनी थेट महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत मिम्स बनवायला सुरुवात केली. ज्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत पासून ते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील याबाबतचे मिम्स आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केल्याचे पहायला मिळाले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः हातात पक्कड घेऊन वायरीच काहीतरी करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे यावेळी काही भोजपुरी मजकूर देखील लिहिण्यात आला आहे. कैसान बा छे मुंबई, ग्रीडफेल हूंइ बा आणी समदी लाईट गयी बा असे म्हणत किसने बनाया बा ये ? असा सवाल देखील यावेळी विचारण्यात आला आहे.
दुसरकिडे नेहमीच ठाकरे सरकारला धारेवर धरणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील खासदार संजय राऊत आणि कुणाल कामराचा फोटो ट्विट करत #Powercut हा कॅप्शन वापरला आहे.
#Powercut in Mumbai, meanwhile Maharashtra government क-क-क…….कंगना । pic.twitter.com/sktcXOihq7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
Read Also