महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी आज सोलापूर दौरा केला.
प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सोलापूर येथे शहर काँग्रेसची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीस महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.
”सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते अत्यंत नेटाने गरीब माणसाला आधार देत आहेत, ही स्तुत्य बाब आहे. सोलापूर शहरात कॉंग्रेसची संघटना मजबूत आहे, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. काँग्रेस नक्कीच आपले गतवैभव पुनर्स्थापित करेल” असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोलापूर शहरात काँग्रेसची संघटना मजबूत आहे, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. काँग्रेस नक्कीच आपले गतवैभव शहरात पुनर्स्थापित करेल याची मला खात्री आहे. सदर बैठकीस महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC उपस्थित होत्या.@INCMaharashtra @kcvenugopalmp
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 8, 2020