महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जयपुर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या भेटीनंर राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
Today met with Rajasthan Chief Minister shri @ashokgehlot51 ji at his residence in Jaipur. . pic.twitter.com/Y5lFoOxrpS
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 1, 2020
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षविरोधात पुकारलेल्या बंडामुले देशाचे राजकीय वातावरण तापले होते. या दरम्यान राजस्थानवर सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसला मोठा राजकीय संघर्ष करावा लागला होता. सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेलत्यानंतर हे प्रकरण मिटले होते . त्यानंतर काँग्रेसने अविश्वास ठराव देखील जिंकला होता व राजस्थानमधल्या राजकीय नाट्याला पूर्ण विराम मिळाला. दरम्यान आज बाळासाहेब थोरात यांनी अशोक गेहलोत यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.