पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्य निकालामध्ये राज्यातील बड्या नेत्यांना मोठ मोठे धक्के बसले आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसले आहेत. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: प्रचार केला होता. पंरतु सरपंच पदासाठी असलेला उमेदवार संतोष टावरे हा पराभूत झाला आहे. तर शिंदे गटाचा उमेदवार रवींद्र पाटील हा विजयी झाला आहे. त्यामुळे याठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: प्रचार करूनही पराभावाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्र स्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारघाव गावामध्ये आहे. त्या पारगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या बाजुच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात आहेत. तर शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे सरपंच झाल्या आहेत.