पुणे : कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव कोरोनाच्या निर्बंधांसह साजरा करण्यात आला. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात स्थानिक भाजप अध्यक्ष रविंद्र साळेगावकर यांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी मॉडेल कॉलनी दीप बंगला चौक परिसरातील नागरिकांसाठी गणेशमूर्ती विसर्जन हौदाची व्यवस्था केली असून सकाळी 7 पासूनच अनेक गणेश भक्त आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी येथे येत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर हौद व्यवस्था केल्यामुळे नागरिकांना आपल्या घरा जवळचं लाडक्या बाप्पाचे विसर्जन करता येत आहे व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा पार पडत असल्याचे भाजप शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर म्हणाले.
स्थानिक नागरिकांकडून देखील या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील रहिवासी, गृहनिर्माण संस्थेच्या नागरिकांनी साळेगावकर यांचे आभार मानले.
या उपक्रमाला भाजप पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शहर उपाध्यक्ष सुनीलजी पांडे व शिवाजीनगर विधानसभा सरचिटणीस प्रतुल जागडे, गणेशजी बगाडे, यांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या.