पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार होता. आता या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले की, आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं, हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असे वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही.
सोबतच सुशांत प्रकरणावर फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असे सांगत, आपली भूमिका स्पष्ट केली आहे.