नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपोषणाला बसलेल्या खासदारांना पांठिबा दर्शवत शरद पवार यांनी देखील आपण एक दिवस अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत आता राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस नागपुरात करोनासंबंधी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. एम्स आणि मेयो रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना शरद पवारांनी खासदाराच्या निलंबनाला विरोध केल्यासंबंधी विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केलेला नाही. त्यांनी काल जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निमित्ताने विरोधी पक्षाला समर्थन दिलं. पण मला असं वाटतं की राज्यसभेतील सदस्य असंशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही असे स्पष्ट मत यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदारांचा अन्नत्याग
राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील अन्नत्याग करत या आंदोलनात सहभागी होत असल्याची माहिती दिली आहे.आमचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय ते एक दिवस अन्नत्याग करत कृषी विधेयकाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या सदस्यांच्या आंदोलनात देखील सहभागी होत आहेत. मी देखील सभात्याग करून बाहेर पडले असून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे खान यांनी यावेळी सांगितले.
Read Also
आमच्यासाठी ‘ही’ शंभर हत्तीचे बळ मिळणारी गोष्ट आहे,काँग्रेस नेत्याने मानले शरद पवार यांचे आभारhttps://t.co/hqXvYaP4Cy#SharadPawar #RajivSatav #KisanBill2020 @SATAVRAJEEV @PawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020