मुंबई : आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. मात्र या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. ताजमहाल या वास्तूच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येतं आहे.
योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. “जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं आहे.
।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ! 🙏🏽 https://t.co/Ro8sA00eOa— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2020
आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.