राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार हे इमॅच्युअर असून, त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करणे टाळले. आता कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही, असे ट्विट करत महाडिक यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज गोपाळकाला आहे..
महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या 'पार्थ'चे युद्धात ज्याने सारथ्य केले..
त्या श्रीकृष्णाचा दिवस..!— Shoumika Mahadik. (@ShoumikaMahadik) August 12, 2020
मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला.माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे.मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही.
— Shoumika Mahadik. (@ShoumikaMahadik) August 12, 2020
शौमिका महाडिक यांनी गोपाळकाल्याच्या निमित्ताने काल ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये पार्थ असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत लिहिले की, मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला.
दरम्यान, शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत.