मुंबई : मला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत राज्यपालांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी ? हे तर सत्तेचे लाचारी !, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
मंदिरे उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याबाबत विचारणा केली होती. या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचाही उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तुमच्याकडून हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपूजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते.”भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते.
◆जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये "शेजारी-शेजारी" बसलेत
◆यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते..
◆"भारत तेरे तुकडे हो हजार" म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते..
एवढेच नाही..तर..1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
एवढेच नाही तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
◆स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली
◆याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले
◆पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही..
हे कसले हिंदुत्वाचे पुजारी?
हे तर सत्तेचे लाचारी! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
Read Also
राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही ! मुख्यमंत्र्यांनी घेतला ठाकरे शैलीत राज्यपालांचा समाचार https://t.co/Yvg6LEt68x#CMUddhavThackarey #BhagatSinghKoshyari #Shivsena @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020