भोपाळ : काँग्रेस सोडून भाजपत आलेले ज्योतिरादित्य सिंदिया यांनी चक्क काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन केलं आहे, यामुळे आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावलाय. भाजपकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, एका जाहीर सभेत मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन केलं! यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजप उमेदवार ज्योतिरादित्य यांच्याकडे पाहतच राहिले.
मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानं चर्चेत आलेल्या भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे डबरामध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी शिंदे यांनी चुकून ३ तारखेला काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी चिभ चावली आणि भाजपच्या कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं.
Read Also ;
साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात, भाजप आमदार भातखळकरांचा पवारांना टोला https://t.co/jGYCJpEDDa @BhatkhalkarA @BJP4Maharashtra @NCPspeaks @MumbaiNCP @PawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020