मुंबई – राम मंदिराच्या उभारणीसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवरून यापूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची. पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’,” असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत यावर टीका केली आहे. वाडा शहर शाखा, शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदतनीधी असं त्या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. यापूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून राम मदिरांसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवर टीका केली होती.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो 'बाब्या' दुसऱ्याचा तो 'कारटा'. https://t.co/gpka5hVjRM pic.twitter.com/O1jRWPH7fv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 30, 2020