मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विधान परिषदेवरील या आमदारांच्या नावांमध्ये रोज नवीन नवीन नावे जोडली जात आहेत. आज शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यावरूनच आता जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही केवळ खुर्च्याच लावा अशा प्रकारची टीका शिवसेनेवर करण्यात येत आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत यावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल त्या नावांना आडकाठी करू शकतात किंवा ही नावं फेटाळली जाऊ शकतात
काय म्हणालेत निलेश राणे नेमकं
जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील.अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.
जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील. https://t.co/YTRXRG6Njr
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2020
Read Also
OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का ? विजय वडेट्टीवार यांचा सवालhttps://t.co/V6mVvaPn8D#Vijaywadettiwar #OBC #MarathaReservation
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020