नारायण राणे हे आता सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर केली होता. आता पाटील यांच्या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील हे किती तास शुद्धीत असतात. त्यांची ऊंची काय?, अशी खरमरीत टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा. हे दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत केव्हा असतात याची माहिती घेऊनच नंतर बोलू.
नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले? राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं, सेनेत असताना मुख्यमंत्रीपदही दिलं. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये,’ असा टोला गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला होता.