मुंबई : अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पार्थ यांचं यावेळीसच ट्विट मराठा आरक्षणासंदर्भात होत आणि पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे विरोधी पक्षानं मात्र स्वागत केलं आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला आहे.
राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. याच मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली आहे. याच घटनेवर पार्थ पवार यांनी ट्विट केलं होतं. अशा दुर्देवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हाव आणि आरक्षणासाठी लढायला हवं, असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
‘महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत आक्रमकपणे पुढे यावं. पार्थ पवार यांनी केलेल्या या मागणीला महाविकास आघाडी गंभीर दखल घेत किंमत देणार का ? की कवडीची किंमत देणार ? असा बोचरा सवाल यावेळी राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण बाबत आक्रामकपणे पुढ़े यावे । हया @parthajitpawar यांच्या मागणीला #MVA गभीरपणे दख़ल घेत किमत देनार ? क़ी कवडीची क़ीमत देनार ? #MarathaReservation https://t.co/X28vB3dCxs
— Ram Kadam (@ramkadam) October 1, 2020
Read Also
‘शटअप या कुणाल’ मध्ये संजय राऊत लावणार हजेरी ! होणार मोठे गौप्यस्फोटhttps://t.co/BTuDsuZrb9#sanjayraut #kunalkamra @kunalkamra88 @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020