मराठा असो की मागासवर्गीय, ठाकरे सरकारचा आरक्षणाबाबत सावळा गोंधळ सुरुच

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शासकीय सेवेतील पदोन्नतीसंदर्भात, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३% जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता, मात्र याला मागासवर्गीयांमधून होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन, ७ मे रोजी जीआर काढून जारी करण्यात आलेल्या या निर्णयाला, बुधवारी राज्य सरकारने तूर्त स्थगिती दिली.

दरम्यान, यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, आमदार गोपीचंद पडळकर यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतवर आल्यापासून, आरक्षणाच्या सर्वच सामाजिक आघाड्यांवर राज्यात अभूतपूर्व असा गोंधळ सुरू आहे. मग ते कुठलंही आरक्षण असो,” असा टोला आघडी सरकारला लगावला आहे.

Recent News