भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर सदस्यपदाचा राजीनामा दिला असून आता ते राष्ट्रवादी प्रवेश करणार हे नक्की झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत बातमी जाहीर केली. भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसेंना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होईल, असं राम शिंदे म्हणाले
एकनाथ खडसे यांना जी किंमत भारतीय जनता पक्षात मिळत होती, ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. त्यांच्याबरोबर असा कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी जी हिंमत केली, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
तसेच गेल्या चार दशकापासून उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यात भाजपच्या विस्तारात खडसेंचा मोठा वाटा राहिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी भाजपच्या वाढीमध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
खडसे राष्ट्रवादी गेले असतील तर… CM ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया https://t.co/YrwaParfOz#Eknathkhadase #CmThackarey #MahavikasAaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020