जळगाव : मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही, असे भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होतेय
घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आरोपांविषयी ते म्हणाले की, झ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल.
बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. त्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आले नाही. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही, असा म्हणत त्यांनी पक्षावरील आपली नाराजी व्यक्त केली.