बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊ आता काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे.
त्यामुळे एनडीएच्या आघाडी असलेल्या जागांची संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीएच्या संख्याबळात फारसा फरक उरलेला नाही. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.
अशावेळी लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.