मुंबई : कोरोना महामारीवरील उपचारांसाठी विदेशातून येणाऱ्या साधनसामग्री, औषधं यांच्यावर लागणारे जीएसटी आणि इतर कर कमी करावे, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहित मागणी केली आहे.
कोव्हिडची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना महामारीच्या लढ्यात परदेशातून येणारी वैद्यकीय साधमसामग्री, औषध यावर लागणाऱ्या करात पुढील 2-3 महिने सुट देण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्रात केली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, रामभाऊ म्हालगी प्रबोधन प्रबंधन समितीचे अध्यक्ष सुधीर मेहता याच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी पियुष गोयल यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे.
मा. @PiyushGoyal जी, कोव्हिडची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. तरी कोरोना महामारीवरील उपचारांसाठी विदेशातून येणाऱ्या साधनसामुग्री, औषधं यांच्यावर लागणारे जीएसटी आणि इतर कर यामध्ये पुढील २-३ महिन्यांकरीता सवलत मिळावी ही नम्र विनंती! pic.twitter.com/9NE4ph0GtT
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 22, 2021
अनेक मदतीची हात पुढे येत आहे. अशात जर त्यांच्याकडून मिळणाऱ्या रक्कमेचा 30 टक्के भाग करामध्येच गेल्यास लोकांपर्यंत कमी सुविधा पोहचतील. त्यामुळे नियमांच्या अधीन जेवढी मदत करता येईल तेवढी करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.