मुंबई : विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय’, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असू शकते, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं.
‘भुजबळ भाजप विरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केली. भाजपला जरी ही दडपशाही वाटत नसली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला का बरं ईडीची नोटीस गेली नाही?’, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.