मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्ह आपल्याला देण्यात यावे यासाठी निवडणुक आयोगाकडे धाव घेतली. यामुळे निवडणुक आयोगही सक्रिय झालेला आहे. मात्र शिवसेनेने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. शिवसेना कोणाची याचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांपासून ते खासदारांपर्यतच्या नेत्यांना आपल्या बाजुने कसं वळवता येईल. त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
“उद्धव ठाकरे यांचाच यामध्ये पालापाचोळा झालाय”; रामदास कदमांचा हल्लाबोल
काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ असलेले खासदार गजानन किर्तिकर यांची भेट घेतली. तर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डोके यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या बाजुने वळवुन शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. यामुळे शिवसेनेला अजुन धक्के बसणार असल्याची चिन्ह दिसत आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत प्रश्न विचारताच दीपक केसरकर थांबले, म्हणाले..;
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नगसेवक आणि स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र शिवसेनेतील जेष्ठ नेते मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत. काही जुने नेते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीचा भाग आहेत. न्यायालयात पक्षांतर बंदी कायद्याचा कीस पडल्यास शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि शिवसेनेची घटना, हे दोन घटक महत्वपूर्ण ठरू शकतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत शिवसेनेतील जमतील तितके निष्ठावंत आपल्या बाजूला वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
“अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकर करावे”; गोपीचंद पडळकरांचं फडणवीसांना पत्र
रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील निवासस्थानी उपस्थित राहून त्याना शुभेच्छा दिल्या. राज्यात युती सरकार स्थापन झाल्याने मंत्रालयावर भगवा फडकत आहे. रामदास कदम ही मुलुख मैदानी तोफ पुन्हा एकदा पक्षबांधनीसाठी धडाडावी अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या राजकीय आयुष्याची ही नवी इनिंग त्यांनी पुन्हा जोशात सुरू करावी, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना दिल्या.
Read also
- “बाबा तुच आहेस का रे”? अजित पवारांनी केली ‘त्या’ फोटोची शहानिशा
- “अजितदादा लवकरच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार”; सचिन खरात
- महाराष्ट्राचा बदला, झारखंडने घेतला, भाजपचे 16 आमदार फुटणार? एकच खळबळ
- “महाराष्ट्र तुमचा मुकाबला करू शकला नाही, पण बंगालमध्ये शेरनी बसलीय”
- “फडणवीसांचा दिल्ली दौरा अचानक रद्द होणे अन् शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे ? महाराष्ट्रात लवकरच महाभारत”