मुंबई : सध्या परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. शहरामध्ये पाणी साचल्याने रस्ते तर ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र असे असून देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. त्याच अनुषंगाने काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप यांनी भाजपला टोला मारण्यासाठी एक ट्विट केले आहे.
दरवर्षी मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबते आणि त्यासाठी शिवसेनेवर वारंवार आरोप केले जातात यंदाही भाजपकडून सेनेला टार्गेट करण्यात आले. त्यावर भाई जगताप यांनी विरोधकांना टोला लगवण्यासाठी पुण्याच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनीची आकडेवारी सांगत एक विशेष ट्विट केले आहे.
सध्या कारण कोणतेही असो विरोधकांकडून मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांचे सर्रास राजीनामे मागितले जातात त्यावरच बोट ठेवत भाई जगताप म्हणतात, भाजपचे २ खासदार, ८ आमदार, १०० नगरसेवक असलेल्या पुण्यात पाणी तुंबले, गाड्या वाहून गेल्या, रस्ते खचले उद्धव ठाकरे राजीनामा द्या ! अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी विरोधकांना उपरोधिक टोला लगावला आहे.
पुण्यात संपूर्ण सत्ता असलेल्या भाजपला भाई जगताप यांनी हा खरमरीत टोला लगावला आहे. सध्या पुणे जोरदार पावसामुळे तुंबल्याने येथील महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपला भाई जगताप यांनी जणू त्यांच्याच वाक्यांची आठवण करून देण्यासाठी हे ट्विट केले आहे.
भाजपचे २ खासदार, ८ आमदार, १०० नगरसेवक असलेल्या पुण्यात
पाणी तुंबले, गाड्या वाहून गेल्या, रस्ते खचले❗
उद्धव ठाकरे राजीनामा द्या❗
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) October 16, 2020
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.
Read Also
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा चेंडू सुप्रिया सुळेंनी ‘या’ नेत्याकडे टोलवलाhttps://t.co/d2wfisk5Z9 @EknathKhadseBJP @supriya_sule #rakshakhadse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020