मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत” अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.