मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना आदरांजली वाहिली. राजीव गांधींची आज ७६ वी जयंती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील राजीव गांधींना आदरांजली अर्पित केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सकाळीच वडील राजीव गांधींना आदरांजली वाहिली. ‘राजीव गांधींकडे दूरदृष्टी होती. ते काळाच्या अतिशय पुढे आहेत,’ अशा शब्दांत राहुल यांनी राजीव गांधींच्या कार्याचं स्मरण केलं.
Rajiv Gandhi was a man with a tremendous vision, far ahead of his times. But above all else, he was a compassionate and loving human being.
I am incredibly lucky and proud to have him as my father.
We miss him today and everyday. pic.twitter.com/jWUUZQklTi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 20, 2020
‘राजीव गांधींकडे दूरदृष्टी तर होतीच. पण ते माणूस म्हणून अतिशय प्रेमळ होते. ते माझे वडील होते ही माझ्यासाठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज आणि नेहमीच त्यांची आठवण येते,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले. १९८४ मध्ये राजीव गांधींच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतली.