काल दिवसभर १८०० रु मागणाऱ्या काकूंचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता काकूंच्या समर्थनार्थ एका काकांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये या काकांनी अतिशय खट्याळ पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ नेटीझन्सकडून करमणूक म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. मात्र प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माणसं काहीही करु शकतात हे या व्हिडीओतून सिद्ध होतं.
अनेकांनी काकूंच्या व्हिडीओ व्हायरल करत जोक्स बनवले, यात एका व्यक्तीने विनोदी शैलीत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. या काकांचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काका म्हणतात की, ५०० च्या तीन नोटा आणि ३०० रुपये कधीही अठराशे होत नाही, यापूर्वीही ते झाले नाही, भविष्यातही हे होणार नाही, कदाचित राज्य सरकार, केंद्र सरकार बदलेल पण अठराशे कधी होणार नाही. या मराठी मावशी आहेत त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. या प्रकरणाची सीबीआयची मागणीही गंमतीशीरपणे या व्यक्तीने केली आहे.
इतकचं नाही, या मावशीचे १५ लाख मोदींनी बुडवले, किती जणांनी त्यांची फसवणूक केली आहे. या तरुणांचा निषेध करतो, लॉकडाऊनमुळे लोकांना कामं मिळत नाही, काम केल्यावर पैसे मिळत नाही, या मावशीने किती सहन करायचं? त्यांच्या अशिक्षितपणाचे किती फायदा उचलावा? असा सवाल त्यांनी केला आहे. मोदींनी नवीन नोटा बदलल्या, दहाची नवीन नोट काढली, वीसची नवीन नोट निघाली, शंभर, पाचशेची आणि दोन हजारांची नवी नोट काढली, मग अठराशेची का नाही? या मावशीच्या फसवणुकीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे असं सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच राजीनामा मागितला आहे.
काकूंच्या 1800 च्या नोटेचा वाद वाढणार आता …
मुख्यमंत्री तुम्ही राजीनामा दया हा काकू वरचा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही .!!😂😂 pic.twitter.com/jvIi5MNGmI— Vij@y ….. (@Shivsanik33) August 30, 2020