परभणी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी, कोणत्याना कोणत्या मुद्यावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहण्यास मिळत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असे वक्तव्य केले आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी परभणीत दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक नव्हते. माज्ञ भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी.
तसेच, काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.