कोल्हापूर – राज्यातील पाच महानगरपालिकांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होत आहे. आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहोत, मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे जाहीर केले.