मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असल्याची टीका केली होती.
मोदींनी सामान्य लोकांसाठी काम करुन भारताचा जीडीपी सर्वात जास्त होईल असं काम केलं. पंतप्रधान आवास योजना, शौचालय आणि सर्वसामान्य जनतेच्या उपयुक्त योजनांना त्यांनी प्राधान्य दिले, असे फडणवीस म्हणाले होते. मात्र फडणवीस यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या टीकेनंतर, असे मत मांडून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केल्याची खरमरीत टीका हाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली होती.
आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटर फडणवीसांच्या भाषणाचा एक क्लिप शेअर केली आहे. यात फडणवीस मोदी सरकारच्या योजनांबाबत सांगत आहे. यावरून काँग्रेसने टीका केली आहे.
शौचालयातून वाढ झालेल्या GDP चा सखोल अभ्यास करून आपले तज्ञ व अभ्यासू मत व्यक्त करतांना मा.मु. pic.twitter.com/ErtYC1SQSA
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 19, 2020
शौचालयातून वाढ झालेल्या जीडीपीचा सखोल अभ्यास करून आपले तज्ञ व अभ्यासू मत व्यक्त करतांना माजी मुख्यमंत्री, असे म्हणत काँग्रेस महाराष्ट्राने फडणवीसांना टोला लगावला आहे.