मुंबई : शिवसेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगांवकर यांनी शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. देशातील सैनिकांचा कराची स्वीट्स या नावामुळे अपमान होत असल्याचे नितीन नांदगांवकर यांचे म्हणणे होते. नांदगांवकर यांनी त्यासाठी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भारत के चाइनीज़ होटलों का चीन से कोई लेना-देना नहीं है,वैसे ही बांद्रा के #कराँची_स्वीट्स का पाकिस्तान से कोई नाता नहीं।
यह सत्य #शिवसेना के बेवक़ूफ़ कार्यकर्ता कब समझेंगे ?
70 साल पुरानी दुकान का नाम बदलने की जो धमकी दी गई है,वो गलत है।मुख्यमंत्री तमाशा न देखें, उसकी रक्षा करें।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 19, 2020
यासंदर्भात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणतात देशातील चायनीज हॉटेलचा चीनशी काडीमात्र संबंध नाही, त्याचबरोबर पाकिस्तानशी वांद्रे येथील कराची स्वीट्सचे कोणतेही नाते नाही. शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना हे सत्य कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी.