नवी दिल्ली : देशाच्या अर्थकारणाला नवीन दिशा देणारे आणि दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंह यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
India feels the absence of a PM with the depth of Dr Manmohan Singh. His honesty, decency and dedication are a source of inspiration for us all.
Wishing him a very happy birthday and a lovely year ahead.#HappyBirthdayDrMMSingh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 26, 2020
राहुल गांधींनी ट्विट केले की, भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
दरम्यान, मनमनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 ला अविभाजित भारताच्या पंजाब प्रांतात झाला. 1991 पासून आजपर्यंत ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 2004 ते 2014 हा त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ राहिला. त्याआधी ते 1998 ते 2004 पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी देखील होते.