मुंबई : अधिकाऱ्याला मारहाण ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्य सरकार, पोलिसांकडून अभय दिलं जात असून हे खूप धोकादायक आहे. त्यामुळे शिवसेनेचं पितळ उघडं पडत आहे. शिवसेना गुंडा पार्टी असून आजही त्यांचा गुंडगिरी करण्यावरच विश्वास आहे. जे कालच्या घटनेवर स्पष्ट दिसलं आहे, असा घणाघात संजय निरुपम यांनी केला आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणावरुन टीका करताना संजय निरुपम यांनी ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे असं म्हटलं आहे. शिवसेनेचं ओझं काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार आहे हे विचारायला हवं असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश होता. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं. यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवर टीका करत कारवाईची मागणी केली होती. अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला असे म्हंटले होते.
Real Also
तुम्ही पहाटे राष्ट्रवादीसोबत शपत घेऊ शकता तर मी देखील. .https://t.co/zOqzlJgc7r@EknathKhadseBJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 12, 2020