मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती. त्यानंतर कंगनाच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली. आता न्यायालयाने कंगनाची ऑफिस बांधकामाची तोडफोड थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हटलंय हाय कोर्टाने
कंगनाला आपले म्हणणे मांडण्याची संधी यावेळी देण्यात येणार आहे.
हाय कोर्टाने बीएमसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कंगनानं तिच्या कार्यालयावर सुरू असलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करुन त्याला पाकिस्तान असं कॅप्शन दिलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असंही म्हटलं आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या घराबाहेर तैनात असलेला फोटो ट्विट करत बाबर आणि त्याचं सैन्य असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020