नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत ३ लाखांच्यावर करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, जगात कुठल्याही देशात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि लसींचा तुटवडा जाणवत असून, या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, करोना साथीचा सर्वाधिक फैलाव झालेल्या आणि त्यामुळे सर्वाधिक आर्थिक-जीवित हानी झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महत्वाची बैठक बोलावली होती.
मात्र काही वेळानंतर मुख्यमंत्र्यांना सूचना देणाऱ्या आणि त्यांच्याकडून राज्यांच्या करोना परिस्थितीची माहिती घेणाऱ्या, पंतप्रधान मोदींनी एकाएकी, या बैठकीत उपस्थित असेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या बैठकीत सर्वच मुख्यमंत्री आपापल्या समस्या पंतप्रधानांपुढे मांडत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. मला दररोज यासाठी फोन येतात. मी काय करावं? मी कोणाला फोन करावा?, असे प्रश्न व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित केले.
मात्र यावेळी केजरीवालांकडून या बैठकीचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. तसेच केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील त्यांचा संवाद गुपचूपपणे रेकॉर्ड करत होते. ही बाब पंतप्रधान मोदींच्या लक्षात येताच त्यांनी केजरीवालांना सुनावलं.
Govt sources added, "Kejriwal has descended to a new low. For the first time, private conversations of PMs meeting with CM was televised. His entire speech was not meant for any solution but for playing politics and evade responsibility."
— ANI (@ANI) April 23, 2021
‘अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. ती आपल्या परंपरेच्या, शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं शिष्टाचाराला धरून नाही. आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, असं मोदींनी म्हटलं.
यानंतर केजरीवाल बांभावून गेले. केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचं मान्य करून, ‘पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,’ असं म्हणत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागितली.
Govt Sources say Delhi CM Kejriwal raised point of airlifting oxygen, but did not know that it is already being done. They added, "He spoke about Oxygen express by Railways but Railway sources say that he has not communicated anything about it to Railways."
— ANI (@ANI) April 23, 2021