पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोव्हीड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसे नगरसेवकावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.
मात्र, एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तवणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे.