मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल बोललं जात होतं. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील ‘रोखठोक’ या स्तंभामधून, प.बंगालच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकर यांच्याशी केली आहे. यावरून आता संजय राऊत यांच्यावर टीका होत असून, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून यासंदर्भांत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
‘ममता बॅनर्जी या पराभूत झाल्या नाहीत, तर आभाळ कोसळेल, असं वातावरण देशभरात निर्माण केलं गेलं, परंतु शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. उलट जे नव्हतं तेच बाईंनी पणाला लावलं. त्यामुळे या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल, असं राऊत यांनी या संपादकीय मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, होळकर यांचे वंशज भूषण राजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या लेखाचा जाहीर निषेध केला असून, “आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा सामानामधील लेख वाचला, आपल्याला अंत्यंत खेदाने सांगू इच्छितो की, ज्या पद्धतीने त्यांनी तो लिहिला आहे, त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. राजकारणात एकमेकांवर खुशाल चिखलफेक करा, पण त्यामध्ये जर राष्ट्रीय व्यक्तींची तुलना आजच्या नेतेमंडळींशी होत असेल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
तसेच, रयतेचे कल्याण करण्याच्या हेतूने संपूर्ण देशभरात कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब यांची तुलना, राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार अत्याचार करणाऱ्या या युगातील राजकीय नेत्याशी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे आधी मासाहेबांचे विचार आचरणात आणा, रयतेचा सांभाळ करा, मग जनताच ठरवेल तुमही योग्यतेचे आहात की नाही, अशी बोचरी टीका त्यांनी पत्रातून केली आहे.
Read Also :
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना
- “आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढणार…”, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
- ‘ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री, एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती!’, भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लबोल
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- सचिन सावंतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले ‘मनोरा आमदार निवास’ची किंमत…