लवकर कोविड सेंटर सुरु करा धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
कोरोनाची दिवसेंदिवस आकडेवारी ही वाढतच चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांसोबत ग्रामीण भागात देखील ही आकडेवारी वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पेठवडगाव शहरामध्ये कोव्हीड केअर सेंटर लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे.
पेठवडगाव शहरांमध्ये तसेच पेठवडगाव परिसरातील गावांमध्ये कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या रुग्णांना अतिग्रे किंवा हातकणंगले येथील कोव्हिड केअर सेंटर किंवा सीपीआर कोल्हापूर येथे जावे लागत होते.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. यामुळेच परिस्थिती लक्षात घेत पेठवडगाव शहरासह परिसरातील गावांच्या सोईसाठी पेठवडगाव शहरामध्ये कोव्हिड केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे पात्र देखील त्यांनी जिल्ह्धिकाऱ्यांना दिले आहे.