मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळलं आहे. तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
“काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.” असे धनंजय मुंडे म्हणाले.
काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2020